वरोरा
चेतन लुतडे
मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे उमेदवार जाहीर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागली होती.
भाजपाचे युवा नेते करण देवतळे यांची उमेदवारी जाहीर होताच स्थानिक विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांची नाराजगी दिसून आली. वडिलांच्या कार्याला पाहून तिकीट देणे संयुक्तिक नाही. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसलेल्या उमेदवारास उमेदवारी जाहीर केल्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वरोरा येथील स्थानिक कार्यालयात पदाधिकाऱ्यांची गर्दी जमली असून भाजप वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती राजूरकर यांनी पक्षाकडे केली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेते हंसराज अहिर निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची मनधरणी करणे सुरू आहे.
तर दुसरीकडे वरोरा विधानसभेमध्ये नेमण्यात आलेले बुधप्रमुख ,शाखाप्रमुख, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाच्या राजीनामा देणार असा इशारा देण्यात आला आहे. राजुरकर यांचा वरोरा विधानसभेत अर्ज दाखल करनार असून सर्व नाराज पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहे.
भाजपाचे किंग मेकर माजी मंत्री हंसराज अहिर भाजपाचे पडलेले खिंडार कितपत वाचवू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment