वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*अज्ञात वाहनाच्या धडकेत 47 वर्षीय इसमाचा मृत्यू**कोंढा गावाजवळील घटना*

*अज्ञात वाहनाच्या धडकेत 47 वर्षीय इसमाचा मृत्यू*

*कोंढा गावाजवळील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           सायंकाळच्या वेळेस आपल्या शेतातून आपल्या गावाकडे दुचाकीने परत जात असलेल्या युवकाच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच  मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 14 रोज सोमवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोंढा  गावाजवळ घडली. अंकुश सुधाकर चिकटे,वय 47 वर्ष, राहणार पाटाळा. असे मृतक इसमाचे नाव आहे. सदर मृतक आपल्या एम एच 34ए एच74 76 या क्रमांकाच्या दुचाकीने जेना येथील शेतातून आपल्या गावाकडे जात होता. कोंढा  गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात सदर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाई केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments