आरटीओ च्या गाडीची गाईंना धडक : एकीचा मृत्यू तर एक गाय गंभीर जखमी* *घोडपेठ गावाजवळील घटना*

*आरटीओ च्या गाडीची गाईंना धडक : एकीचा मृत्यू तर एक गाय गंभीर जखमी*

 *घोडपेठ गावाजवळील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-
          चंद्रपूर वरून वरोऱ्याकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या आरटीओ वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या दोन गाईंना धडक दिल्याने झालेल्या  अपघातात एका गाईचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना दिनांक ८ रोज रविवारला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घोडपेठ  गावाजवळ चंद्रपूर-नागपूर हायवे वर घडली. सदर  वृत्त लिहेपर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. सदर प्रकाराची योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरटीओचे एम. एच.०४केआर 64 34 हे स्कार्पिओ वाहन चंद्रपूरकडून वरोऱ्याकडे जात असताना घोडपेठ गावा जवळ रस्ता ओलांडणाऱ्या दोन गाईंना या वाहनाने जबरदस्त धडक दिली. यात एका गाईच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय  यात गंभीर जखमी झाली. गायीच्या मृत्यूमुळे गाय मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.


Comments