खांबाडा येथील बोगस डॉक्टर वर धाड ,वरोरा पोलिसात गुन्हा दाखल


खांबाडा येथील बोगस डॉक्टर वर धाड 
*वरोरा पोलिसात गुन्हा दाखल*

फक्त बातमी 

वरोरा ता 25- तालुक्यातील खांबाडा  या गावात रुद्र रॉबिन मंडल हा बोगस डॉक्टर गेल्या अनेक वर्षापासून मा काली क्लीनिक या नावाने आपला दवाखाना थाटून अनेक रुग्णांवर बोगस उपचार करत होता. सोमवारला  दुपारी नायब तहसीलदार लोखंडे, आरोग्य वैधकिय अधिकारी बाळू मूजनकर यांनी खांबाडा येथील मा  काली रुग्णालयात धाड  टाकून कारवाई केली. आणि तशी तक्रार  वरोरा पोलिसात दाखल केली .त्या अनुषंगाने वरोरा पोलिसांनी डॉक्टर  रुद्र रॉबीन मंडल यांच्यावरती   गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा  तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार  खांबाळा येथे मंडल हा बोगस डॉक्टर अवैध व्यवसाय करत असल्याचे माहित झाले. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग महसूल विभाग आणि पंचायत विभाग चमूने कामाला येतील डॉक्टरच्या रुग्णालयात धाड टाकली. रुग्णालय चालवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिनियम 1961 प्रमाणे त्या बोगस डॉक्टर कडे कुठलाही अधिकृत परवाना मिळाला नाही. धाड टाकलेल्या चमूने त्या बोगस डॉक्टरला उपचार करताना रंगेहात पकडून त्याच्याकडील इंजेक्शन सलाईन आणि औषधे जप्त करून वरोरा पोलिसात पुराव्यानिशी कागदपत्रे आणि पंचनामाची देऊन तशी तक्रार केली वरोरा पोलिसांनी मंगळवारला त्या बोगस डॉक्टर वरती कलम 33, 33  A 36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
डॉ मंडल मुळे आमच्या मुलीचा जीव गेल्याचा पालकांचा आरोप
खांबाडा गावा जवळ असलेल्या गोविंदपुर येथील क्षमता मोरेश्वर नाईक वय 11 वर्ष या मुलीचा जुलै महिन्यात 31 तारखेला मृत्यू झाला होता. डॉक्टर मंडल यांच्याकडे योग्य पद्धतीने औषध उपचार झाला नसल्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असून माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी डॉक्टर मंडलच जबाबदार आहे असा आरोप मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी केला आहे.

  वरोरा तालक्यात बोगस डक्टरांचां सुळसुळाट
वरोरा तालुक्यात असे अनेक बोगस डॉक्टर आहेत.2016पासुन  बोगस डक्टरांवर कारवाही झाली नसल्याने त्यांनी गाव खेड्यात आपली दुकानदारी थाटली आहे अशा बोगस डॉक्टरांमुळे  अनेकांना आपला जीव गमवावा लागत असतो.अश्या बोगास डॉ  वर कारवाई करणे  आवश्यक झाले आहे.

Comments