वरोरा शहरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा.
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा शहरातील मध्य भागात श्री. झोपला मारोती देवस्थान, मोकाशी ले-आऊट, वरोरा येथे प्रख्यात आहे. तान्हा पोळा सना निमित्त शिवसेनेचे युवा सेना माजी जिल्हा प्रमुख श्री. मनीष जेठाणी यांच्या वतीने बाल गोपालांसाठी तान्हा पोळ्याचे आयोजिन मागील चार वर्षापासून करण्यात येत . या वर्षी सुद्धा तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळा करीता गुढीचे मानकरी श्री. वामनराव खिरटकर यांनी गुढी व श्री. गुलाबराव जगताप यांनी नंदी पूजन करून सुरुवात केली. यावेळी लहान मुलांनी आपले लाकडी बैल सजवून स्पर्धेमध्ये आणले होते. या परिसरातील लाकडी बैल सजावटीसाठी लक्की ड्रॉ पद्धतीने टोकन काढून बक्षीस वितरण करण्यात आले.
बाल-गोपालांकरिता 3 मोठी सायकल, 2 लहान सायकल, 2 स्टडी टेबल, 2 क्रिकेट किट, आणि 2 बॅडमिंटन किट, असे एकूण 11 बक्षीस ठेवण्यात आलेली होती. तसेच एकूण 300 नंदीची नोंदणी व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणी केलेल्याना एक टिफिन बॉक्स भेट स्वरूपात देण्यात आली.
सदर कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श्री. रमेश जाजू, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुरलीजी जेठाणी, डॉ. श्री. प्रशांत पिपळकर, श्री नारायणरावजी वराटकर, श्री. डी. एन. माथनकर, श्री.अरुनजी ढोके, श्री. पुरुषोत्तम पिदुरकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, कार्यक्रमाचे आयोजक श्री. मनीष जेठाणी यांनी व सूत्रसंचालन कु. हार्दीकी चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता श्री. झोपला मारोती देवस्थान वरोराचे
श्री. सुनील कोल्हे, श्री. नितीन उमरे, श्री. अशोक ढवस, श्री. बंडू पिपळकर, श्री. रामदास जी भोयर, श्री. दशरथ लाखे, श्री. अरुण उमरे, ई. कार्यकर्ते तथा मोकाशी ले आऊट मधील सर्व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment