*दिव्यांगांनाही कौशल्य प्राप्त करून देणारे देशातील हे पहिलेच केंद्र:ना. उदय सामंत*
*प्रस्तावित कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्राच्या भूमी पूजन प्रसंगी प्रतिवादन*
वरोडा शाम ठेंगडी
आनंदवनात उभी होत असलेली कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्राची इमारत ही केवळ इमारत नाही किंवा आयुष्यात स्वतःच्या परिवारासाठी उपजीविका प्राप्त करून देणारी जागा नसून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना निर्माण करणारे आनंदवनातील हे केंद्र ठरेल असा आशावाद राज्याचे वन व मत्स्य मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आनंदवनात बोलताना व्यक्त केला.
महारोगी सेवा समिती व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर रोज गुरुवारला आनंदवनात प्रस्तावित कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्राच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वन,सांस्कृतिक कार्य व मस्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी विनय गौडा, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे, आनंदवन ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली दरेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
"भीक नको संधी हवी" या तत्त्वावर काम करणारे आनंदवन म्हणजे आत्मनिर्भर गावाची कल्पना ही आनंदवनातच पाहायला मिळते. आनंदवनात कुष्ठरोगी, अंध, अपंग, दिव्यांग यांच्या शारीरिक गरजांसोबत त्यांच्या मानसिक गरजा पूर्ण करण्याची काम केले जाते असेही असेही सुधीर मनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.
राज्याच्या उद्योग मंत्रालयाने अनेक उद्योग उभे केले.हे उद्योग आपणास पैसा कमावून देईल. परंतु आनंदवनात उभे राहणारे हे केंद्र हा एक असा उद्योग आहे जे धन प्राप्त करून देणार नाही पण आपणास यातून पुण्य प्राप्त होईल. जे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि पुढील जन्माच्या पहिल्या श्वासापासून कामाला येईल असे सांगत सुधीर भाऊ पुढे म्हणाले,आमटे परिवार हा सात्विक संताचे जीवन जगत वंचित व दीनदुबळ्याची सेवा करीत आहे. जीवनात आपण जे कमवतो ते बँकेत टाकून व्याज प्राप्त होत असते पण विश्वासाने सांगतो सर्वात जास्त व्याज ज्या बँकेत मिळते की बँक ही देवाची बँक आहे. तेथे पैसे नाहीत तर पूण्य चालते आणि या बँकेत सर्वात मोठं खातं कोणाचे असेल तर ते आमटे परिवाराचे खात आहे.असे आमटे परिवाराचे कौतुकही सुधीर भाऊंनी केले.
*रोजगार देण्याची प्रक्रियाही या केंद्रातूनच:सामंत*
राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम पाहायचं असेल तर आनंदवनात यावे. या परिसरात आल्यानंतर सामाजिक कामासाठी काय करायचे असते, हे येथे आल्यानंतर समजते. आपल्या आयुष्यात चांगलं काम व्हावे असे वाटत असेल तर हे काम करण्यासाठी आनंदवन सारखं स्थान नाही असे गौरवोद्गार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी काढले.
या कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रातून सक्षम प्रमाणे कौशल्य प्राप्त करणारा विद्यार्थी तयार होईल व या केंद्रातून रोजगार देण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगत ते म्हणाले, या कौशल्य प्रशिक्षण केंद्रातून अंध, अपंग, दिव्यांग यांनाही शिक्षण दिले जाईल. दिव्यांगांनाही कौशल्य प्राप्त करून देणारे हे देशातील पहिलेच केंद्र ठरेल.
आनंदवनात निर्माण होत असलेल्या या कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रातून अंध, अपंग, दिव्यांगासह जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या केंद्रासाठी औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जवळपास दहा कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे आनंदवनातील अंधविद्यालय, वस्तीगृह,शाळा,अंतर्गत रस्ते यांच्या नूतनीकरणासाठी निधी देण्यात आलेला आहे.
मान्यवरांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स्वरानंदवनातील विद्यार्थ्यांनी" आनंद साधकांनो, या रे मिळून सारे, मुक्तांगणात यारे, हे गीत सादर केले.
आनंदवनाच्या अंतर्गत पल्लवी आमटे यांनी आपल्या प्रस्ताविकात आनंदवनाची वाटचाल विषद केली. रवींद्र नलगंटीवार यांनी कार्यक्रमाचे संचालन तर औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत इर्रावार यांनी उपस्थितांचे आभार मानले
*खासदारांच्या अनुपस्थितीची चर्चा*
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत निमंत्रितात चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर,विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले व अभिजीत रंगारी यांची नावे असताना हे तिघेही या शासकीय कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यांच्या अनुपस्थितीबद्दल कार्यक्रम स्थळी कुजबुज ऐकावास मिळाली.
Comments
Post a Comment