वरोरा तालुक्यातील आनंदवन परसोडा, खैरगाव, सूर्ला, बोर्डा, जामगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ.


वरोरा तालुक्यातील आनंदवन परसोडा, खैरगाव, सूर्ला, बोर्डा, जामगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ.

वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 


वरोरा तालुक्यातील आनंदवन परसोडा, खैरगाव, सूर्ला, बोर्डा, जामगाव परिसरात धुमाकूळ घातलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याबाब वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले .मागील आठ ते दहा दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातलेला आहे. सदर वाघाने खैरगाव मधील मरसकोल्हे यांच्या रेडा मारला तसेच परसोडा येथील लक्ष्मण उईके यांच्या बैलावर हल्ला करून जखमी केले. परसोडा येथील निळकंठ गारघाटे यांचे वगार मारले यानंतर जामगाव बु येथील राजू आसुटकर यांची गाय जखमी गेली आहे. सदर वाघ शेतकऱ्यांवर व शेतमजूर यांच्यावर कधीही हल्ला करेल या भीतीने शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी शेतीची कामे व शेतीत जाणे बंद केलेले आहे.  या परीसरात शेतकरी वाघाच्या दहशतीत असून शेतातील कोणतीही कामे होत नाही त्यामुळे लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करण्याची विनंती वनविभागाला यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुरुषोत्तम पावडे  कृ उ बा वरोरा  संदिप दडमल सरपेच परसोडा बालाजी जिवंतोड सरपंच शेंबळ  शरद आसुटकर गणेश घागी  अक्षय ताजने ग्राप सदस्य जायगाव प्रविण बदकी मोहन परचा के राहुल नन्नावरे  गजानन जिवतोडे विजू डाखरे व परिसरातील शेकडो शेतकरी व शेतमजूर हजर होते

Comments