*तेलंगाणातून पैदल हज यात्रेसाठी निघालेल्या अब्दुल आबीद यांचा सत्कार*

*तेलंगाणातून पैदल हज यात्रेसाठी निघालेल्या अब्दुल आबीद यांचा सत्कार*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            तेलंगाणा राज्यातील ईलंदूर ( भद्राचलम ) येथील अब्दुल आबीद हे हज यात्रेसाठी पैदल मक्का - मदिनासाठी रवाना झालेले आहेत. प्रवासादरम्यान ते भद्रावती येथे आले असता शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दाराजवळ येथील मुस्लीम समाजातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना जामा मज्जीद येथे सन्मानपूर्वक आणुन त्यांचा शाल व पुष्पमाला देऊन सत्कार करण्यात आला. अब्दुल आबीद हे दररोज जवळपास पंचेविस किलोमीटर अंतर प्रवासादरम्यान कापत असुन त्यांना मक्का-मदिना येथे पैदल पोहोचण्यास अकरा महिण्यांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. त्याच्या सत्काराच्या वेळी इमाम मौलाना फारुक, मुनाज शेख, महेबुबखा पठान, हाजी इसराईल खान, हाजी सरदार खान, मन्ना शेख, रियाज अली, अनीस शेख, जमील शेख, इरफान कुरेशी, अफजल शेख, आकीब खान, कयाज शेख, रेहान शेख, अनीस पठाण, हाजी अब्बास शेख आदी ऊपस्थीत होते. शहरातील मुस्लिम समाज बांधवांतर्फे अब्दुल आबीद यांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments