*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न**कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
वरोरा
चेतन लुतडे
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत उपबाजार आवार चंदनखेडा येथे नुकतेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी वे-ब्रिज काटा बसविण्यात आला असून गुरूवार दिनांक 12/09/2024 ला कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. रवींद्रभाऊ शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर यांचे शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. रवींद्रभाऊ शिंदे म्हणाले, की बाजार समितीचे संचालक मंडळाचे नियमितपणे बाजार समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवून बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने समोर नेण्याचे कार्य करीत असून यांचे संपूर्ण श्रेय बाजार समिती पदाधिकारी व संचालक मंडळ व अधिकारी यांना देण्यात येत आहे. तसेच जिथेपण आवश्यकता असेल तिथे भविष्यात शेतकरी बांधव यांच्या व बाजार समितीच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मदत घेऊन विकासाची घोडदौड सुरू ठेवू असे रवींद्र शिंदे म्हणाले. यावेळी बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर लटारी ताजने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की बाजार समितीचे उपबाजार आवार चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ असून येथे प्लँटफार्म व लिलाव शेडची कमतरता जाणवत होती. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच रविंद्रभाऊ शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व विकासात्मक दृष्ट्या मदत घेण्याची सूचना करीत असल्याने आम्हाला विकासात्मक कामाला गती मिळत आहे. याचप्रकारे बाजार समितीचे सर्व संचालक व कर्मचारी वृंद शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत राहील. यापुढे सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा येथे विक्रीस आणावा असे आवाहन सभापती महोदयांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. भास्कर लटारी ताजणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती तसेच सहउद्घाटक श्री. गजानन दिनाजी उताने बांधकाम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती प्रमुख पाहुणे सौ.अश्लेषा मंगेश भोयर (जीवतोडे ) उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती. संचालक श्री परमेश्वर ताजणे. श्री. शरद जांभुळकर श्री. श्यामदेव कापटे श्री. कान्होबा तिखट श्री . मनोहर आगलावे श्री. राजेंद्र डोंगे श्री.राजु आसुटकर सौ. शांताबाई रासेकर चंदनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच श्री.नयन जांभुळे मुधोली ग्रामपंचायतचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, अडते मनिष सारडा, व्यापारी महेश घोडमारे, विकास मगरे, किशोर निखार आणि बाजार समितीचे कर्मचारी वृंद श्री. विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत, हनुमान मगरे, यासोबत परिसरातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment