सेंट ॲनिस पब्लिक स्कूलचा निष्काळजीपणा उघडचुकीच्या पुस्तक यादीने पालकांमध्ये संभ्रम; पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार

सेंट ॲनिस पब्लिक स्कूलचा निष्काळजीपणा उघड चुकीच्या पुस्तक यादीने पालकांमध्ये संभ्रम; पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार वरोरा, १/४/२६ : एनसीईआरटीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) नुसार नवीन अभ्यासक्रम लागू झाला असून जुनी पुस्तके बदलवत, इयत्ता 6, 7, 8 साठी नवीन सामायिक पुस्तके लागू करण्यात आली आहेत. मात्र, रिझल्टच्या दिवशी सेंट ॲनिस पब्लिक स्कूल वरोरा शाळा व्यवस्थापनाने जुन्या पुस्तकांची चुकीची यादी पालकांना देऊन ती पुस्तके विकत घेण्याचे सांगत मोठा संभ्रम निर्माण केला. ही जुनी पुस्तके बाजारात कुठेही उपलब्ध नसल्याने पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शाळेने जाणीवपूर्वक पालकांना वेठीस धरल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. वरोरा येथील सेंट ॲनिस पब्लिक स्कूलवर शिक्षण विभागाने यापूर्वीच बेकायदा पुस्तक विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. मात्र, तरीही या शाळेचा बेजबाबदारपणाचा प्रकार उजेडात आला आहे. दिनांक 30 मार्च रोजी इयत्ता 5, 6, 7 चे रिझल्ट शाळेतून देण्यात आले होते. यावेळी शाळेने इयत्ता सहा, सात आणि आठच्या कालबाह्य झालेल्या जुन्या पुस्तकांची यादी शाळेत लावली होती. पालका...

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
००००

Comments