वरोरा
चेतन लुतडे
वरोरा तालुका व शहरातील विविध समस्यांचे निराकरण आणि न्याय मिळवण्यासाठी शेख जैरुद्दीन (छोटू भाई) यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे आयोजित करण्यात आला.
वरोरा तालुक्यातील विविध समस्या संदर्भात व प्रकल्पग्रस्त रानतळोदी, पळसगाव, गावातील समस्या बाबत छोटू भाऊ शेख यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा वरोरा येथील उपविभागीय पोलीस कार्यालय नेण्यात आला. मागील बऱ्याच वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित आहे. या गावातील बहुतांश नागरिक आदिवासी समाजाची असून प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. गावातील रोड ,नाली, पिण्याचे शुद्ध पाणी, शाळा, दवाखाना, अंगणवाडी केंद्र अशा बऱ्याच सुविधांपासून हे गाव वंचित आहे. थातूरमातूर इमारती उभ्या करून प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र या ठिकाणी अजूनही बऱ्याच समस्यांना गावकरी तोड देत आहे.
नवीन उपविभागीय अधिकारी तथा ॲडिशनल कलेक्टर म्हणून नियुक्ती झालेले डी झेनित चंद्रा सध्या कार्यरत असून प्रकल्पग्रस्त शेतकरी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
डोंगरगाव ,नागरी येथील अवैध उत्खनन , वाढत असलेले विद्युत युनिट दर, वन हक्क प्रकरणे, अतिक्रमित जागेची नियमित पट्टे देण्याबाबत, कोळसा खदान नितीन ब्लास्टिंग , सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई.
अशा अनेक विविध मागण्या घेऊन छोटू भाऊ शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
वरील मागणीवर उपविभागीय अधिकारी संबंधित कार्यालयाला विचारपूस करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या आंदोलनात छोटू भाऊ शेख यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त व त्यांचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment