तालुक्यातील गावात शेतकर्याच्या विविध मागण्याचे फलक लावून सर्जा राजा सोबत पोळा साजरा बैलांच्या पाठीवर मागण्यांचे गोंदन
तालुक्यातील गावात शेतकर्याच्या विविध मागण्याचे फलक लावून सर्जा राजा सोबत पोळा साजरा
बैलांच्या पाठीवर मागण्यांचे गोंदन
तालुक्यातील पोहे गावात गेल्या दहा वर्षापासून बक्षीस पोळा साजरा
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील वेगवेगळ्या गावांमध्ये बैलांच्या पाठीवर सरकार बाबतचे वेगवेगळे फलक गोंदवून निदर्शने दाखवण्यात आली.
पोळा म्हटलं कि बळीराजाचा वर्षातील सर्वात मोठा सण,
ज्या बैलावर आपले जीवन जगतो त्या बैलाला या दिवशी सजवून धजवून, गावातील चौकात एकत्र ऐकून सर्व गावकरी बैल पोळा भरवत असतात.
मात्र या वेळी तालुक्यातील अनेक शेतकरी यांनी वेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करत आपल्या न्याय हक्काचा मागण्या चक्क बैल यांच्या पाठीवर लिहून, सोयाबीनला सहा हजार भाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला बेसिक भाव मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे तसेच वेगळा मागण्याचे पोस्टर लावून साजरा केला,
आज पर्यंत फक्त शेतकरी सरकार सोबत लढत होता मात्र सरकारला शेतकरी यांचे काही देणे घेणे नसल्याने आज शेतकरी यांनी आपल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या बैल यांना सोबत घेऊन सरकारला हाक दिली.
तालुक्यातील पोहे गावात गेल्या दहा वर्षापासून बक्षीस पोळा साजरा
आयोजक :- हनुमान देवस्थान समिती ,तंटामुक्त समिती,आणि ग्रामपंचायत पोहे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला...गावाचे प्रतम नागरिक सौ. माया अरविंद झाडे (सरपंच ग्रामपंचायत पोहे) श्री .चंद्रशकर घनशाम टापरे. व प्रमुख अतिथी,श्री .शिवराम ल्टारी रोडे ( माजी प्राध्यापक ) श्री .विजय प्रभाकर खंगार (प्राध्यापक) श्री.गजानन बापूराव झाडे(वावसायिक)
द्वितीय पुरस्कार श्री विठ्ठल जी नवघरे
तृतीय पुरस्कार श्री मारोतराव उरकांदे
Comments
Post a Comment