*तालुक्यातील ऊर्जाग्राम सायवन येथील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :
तालुक्यातील चंद्रपूर नागपूर महामार्गावरील ऊर्जाग्राम तडाली तथा सायवन या गावाजवळ जंगलातून भटकलेल्या अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. सदर घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान पोलीसही त्या ठिकाणी हजर झाले होते.
सदर घटनेची वन विभागाला माहिती मिळतात रात्री साडे ११ वाजताच्या सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अस्वलाचे प्रेत रात्री २ वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय भद्रावती येथे आणण्यात आले. सदर अस्वल ही मादा प्रजातीची असून तिचे अंदाजे वय पाच ते सहा वर्षाचे होते.त्या ठिकाणी पंचनामा करून सदर प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता आयुध निर्मानी परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नर्सरीमध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारास सर्वप्रथम भद्रावती येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रोडे व चंदनखेडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. ताजणे यांनी अस्वलाची उत्तरिय तपासणी केली. त्यानंतर वनविभागाद्वारे शासकीय ईतमानाने अंत्यसंस्कार करण्यात आला. सदर प्रेताची विल्हेवाट वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, मानद वन्यजीव प्रतिनिधी अनुप येरणे आणि वनपरिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी यांनी केली.
Comments
Post a Comment