पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष. जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे.

पर्यावरण समितीचे रेती प्रकल्पावर दुर्लक्ष.  जीपीएस, सीसीटीव्ही आणि हेल्पलाइनची चेक करण्याची व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वरोरा /चेतन लूतडे:  वनी-मारेगाव तालुक्यातील वाळू घाटात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकाने रेती घाटांवरील नियमावली आणि देखरेखीच्या प्रश्नावरुन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहे . सद्यस्थितीत  वाहनांवर ट्रॅकिंग डिव्हाइस ( जीपीएस) बसविण्यात आले असले तरी, घाटामधून स्टॉक वर ही रेती वाहतूक केली जाते त्या वाहनावर जीपीएस नाही. आणि एकाच टिपी वर दिवसभर ही वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. घाटाचे ठिकाण ते सगळ्यात दूरचे ठिकाण अशी टीपी फाडून दिवसभर चालवली जाते. वर्धा नदी आपटी घाट पात्रातून  दिवस रात्र वाळू उपसा करून स्टॉक जेवढा होता तेवढाच केला जात असल्याचे सांगितले जाते. अधिकारी तपासण्यासाठी जरी आले तरी तो स्टॉक दिलेल्या माहितीपेक्षा  थोडा कमी करून दाखवल्या जातो.  ग्रामपंचायत आपटी  ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे आमच्याजवळ कोणतीह...

*जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे' यावरील मनोगताने सभागृह झाले भावनिक*

*जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे' यावरील मनोगताने सभागृह झाले भावनिक* 

*भद्रावतीत शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंती निमित्त स्नेह मिलन सोहळा संपन्न* 

 *स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम*
-------------------------------------------------
भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून आज (दि. ५ सप्टेंबर) ला स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंतीच्या निमित्ताने सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला उद्घाटक स्वरूपात श्री. बळवंतदादा गुंडावार, सह-उद्घाटक माजी मुख्याध्यापक श्री. मदनराव ठेंगणे सर, तसेच सोहळ्याचे अध्यक्ष आनंदवनचे विश्वस्त श्री सुधाकरजी कडू सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. ऍड. पुरुषोत्तमजी सातपुते, माजी मुख्याध्यापक श्री. भाऊरावजी कुटेमाटे सर, माजी मुख्याद्यापिका चंद्रकला पारोधे काकू, श्री. चंपतजी आस्वले, श्री. रामभाऊजी पारधी, श्री. विठ्ठलजी हनवते, श्री. देहारकार सर, श्री. पुरुषोत्तमजी मत्ते, श्री. कोरडे सर, श्री. अण्णाजी नवघरे, श्री. जांभुळकर सर, श्री. वैद्य सर, माजी नगरसेवक श्री. नंदू पढाल, श्री. सुधीर सातपुते, श्री. किसनजी माटे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री. धनराजजी आस्वले तथा ट्रस्टचे संस्थापक श्री. रविंद्र शिंदे उपस्थित होते.
उपस्थित मंडळींनी त्यांच्या आयुष्यभरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाला मनोगतातून वाट मोकळी करुन दिली. याप्रसंगी ‘जीवनात काय कमावले, काय गमावले, काय घडवले व सद्यस्थितीत काय सुरू आहे, या विषयावर मंडळींनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे संचालन श्री. मंगेश भोयर यांनी केले तर प्रास्ताविक श्री. रविंद्र शिंदे यांनी केले. सोहळ्याला सरकारी अधिकारी, सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------

Comments