तंमुसच्या पुढाकाराने चंदनखेडा येथील प्रेमी युगल विवाहबद्ध : आदर्श गावात विवाह**दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*
*दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ*
अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा येथील सुरेश काशिनाथ कोडापे (30) व भाग्यश्री ईश्वर कांबडे(24) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
दिनांक 05 सप्टेंबर 2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई वडिल भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह 05 सप्टेंबर 2024 गुरुवार ला.सायंकाळी 8:15 ला.विवाह हनुमान मंदिर सीताबर्डी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,लोकेश कोकुडे, शाहरुख पठाण, विठ्ठल महागमकार,चंद्रभान बोढे,बंडूजी गोहणे,प्रकाश सोरते, बाळकृष्ण गोहणे संदीप मानकर, सागर मानकर, निसार का पठाण,अतुल घरत, , गणेश जिवतोडे,सुरज भोयर, गणपत घरत,, अक्षय मोहाळे, अंकुश चट्टे तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते,कासाबाई कांबळे,सोनाबाई खडसंग, ,दिवाकर गोहणे, दिनेश दोडके, देवानंद पांढरे, वृषभ दडमल,देवानंद दोडके,अमोल महागकार,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
Comments
Post a Comment