चित्रकला महाविद्यालय निर्मितीसाठी कला क्षेत्रातील शिक्षकांनी एकत्र यावे. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन
लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन
वरोरा, फक्त बातमी
चेतन लुतडे
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 25, 26, 27,28 संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. यावेळी वरोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
तालुक्यातील लोकमान्य विद्यालयाच्या सेंटर वर असलेल्या एलिमेंट्री परीक्षेला 655 तर एंटरमीजीट परीक्षेला 555 असे एकूण 1205 विद्यार्थी बसले. तालुक्यातील एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थीचा सहभाग बघून लोकशिक्षण संस्थेच्या संचालकांना सुखद धक्काच बसला. कला शिक्षकांनी एकत्र येऊन चित्रकला महविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा यामध्ये स्वतः मदत करण्याची आश्वासन त्यांनी दिले.
तालुक्यातील बऱ्याच शाळेमधून मुलांनी सहभाग दर्शविला होता त्याचप्रमाणे आनंदवन येथील अंध अपंग विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात चित्रकला परीक्षेत सहभाग घेतला. त्यामुळे या परिसरात चित्रकला महाविद्यालय असण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमध्ये चित्रकले विषयी असणारी आवड, आणि अद्यावत मीडियातील चित्रकलेत निर्माण झालेल्या संध्या यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असल्याचे मत संचालक ब्रह्मदत्त पांडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यात अविनाश कांबळे चित्रकला शिक्षक म्हणून लोकमान्य विद्यालयात कार्यरत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून चित्रकला क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन विद्यार्थी घडवत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आवड निर्माण झाली आहे. याबद्दल संचालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी संचालक ब्रह्मदस्त पांडे, संचालक मंगेश मल्हार, मोहन गोगुलवार, सुनील विजवे, सचिन बोमकंटीवार, चेतन लुथडे, अविनाश कांबळे, प्रलाद ठक, धर्मेलवार यांच्यासह कला शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment