खांबाडा येथे महिलेकडून अवैध दारू विक्री; पोलिसांची कारवाई, २२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खांबाडा येथे महिलेकडून अवैध दारू विक्री; पोलिसांची कारवाई, २२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त बातमी: चेतन लूतडे  वरोरा, दि. 9 एप्रिल – पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने खांबाडा येथे छापा टाकून ४५ वर्षीय महिलेकडून अवैध दारू जप्त केली. आरोपी लिना चंद्रकांत बोरकर ही मजुरीचा धंदा करते व खांबाडा येथील बस स्टॉपजवळील खोलगट भागात देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांच्या उपस्थितीत संशयित महिलेकडे झडती घेतली असता तिच्याकडून ३८ सिलबंद देशी दारूच्या शिश्या (प्रत्येकी ९० एम.एल.), ७०० रुपये रोकड असा एकूण २,२२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीकडे दारूचा कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५(ई) अन्वये दिनांक सात तारखेला वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे . वरोरा आणि खांबाडा येथील दोन पंचाच्या समक्ष पंचनामा करून दारूचा नमुना तपासणीसाठी जप्त करण्यात आला.  ही दारू कुठून...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा चा व्हॉलीबॉल संघ शालेय जिल्हास्तरावर प्रथम तसेच जलतरण स्पर्धा,कॅरम व तायकांडो स्पर्धेत सुद्धा यशस्वी शालेय विभागीय स्तरावर निवड

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा चा व्हॉलीबॉल संघ शालेय जिल्हास्तरावर प्रथम तसेच जलतरण स्पर्धा,कॅरम व तायकांडो स्पर्धेत सुद्धा यशस्वी शालेय विभागीय स्तरावर निवड 

फक्त बातमी 

            संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथील 14 वर्षाखालील मुलांचा हॉलीबॉल संघाने शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या संघामध्ये दक्ष चव्हाण,गिरीश आवारी, एकांश राजूरकर,आयुष गाडगे,आदित्य लांबट,आकृत राठोड,सोहम जाधव, साईराज राठोड,लकी पिंपळकर,मोहित मोरे,दर्श रिधोरे,पियुष चव्हाण,या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा या संघाला विजय मिळवून दिला.
 तसेच शालेय जलतरण स्पर्धेत नयन फुंडकर व पार्थ वानखेडे तायकांडो स्पर्धेत निशांत येथे कॅरम या स्पर्धेत पार्थ घाटे यांची निवड शालेय विभागीय स्तरावर झालेली आहे या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मानकचंदजी मालु माननीय श्री अनिलजी डोंगरे (Accdamic Cordinator) माननीय श्री सुरेशजी मालु(सचिव )माननीय श्री जॉन्सन थॉमस(प्राचार्य )शारीरिक शिक्षण विभाग, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.

Comments