वरोडा : श्याम ठेंगडी
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्याकडे काल 23 सप्टेंबर रोज सोमवारला पहाटे अज्ञात चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.परंतु चोरांचा हा प्रयत्न असफल ठरला.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम या चार ते पाच दिवसापासून सुट्टीवर गेल्या आहेत. त्यामुळे संधी साधून चोरांनी अभ्यंकर वार्डातील त्यांच्या निवासस्थानी शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या घरी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चा डीव्हीआर तोडून नेल्याची माहिती आहे . त्यांच्या घरून इतर कोणत्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे वृत्त आहे.
काल सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम या गाऊन परत आल्या असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला व त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
वरोडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता पंचनामा करून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात वरोडा पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरांनी चोरी करण्याचे धाडस केल्याने खळबळ माजली आहे.
Comments
Post a Comment