*लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर**लोकमान्य विद्यालय भद्रावती चे शिरपेचात मानाचा तुरा*
*लोकमान्य विद्यालय भद्रावती चे शिरपेचात मानाचा तुरा*
अतुल कोल्हे भद्रावती :-
गडचिरोली येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा १७ वर्षाखालील मुलांचा व्हालीबॉल संघ विजयी झाला असून हा संघ यानंतर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विभाग स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालयाच्या या संघाने दि. 26 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत सर्वप्रथम गोंदिया जिल्हा त्यानंतर चंद्रपूर मनपा व अंतिम सामन्यामध्ये बलाढ्य नागपूर ग्रामीण संघाला जोरदार टक्कर देत अटीतटीच्या लढतीत तिसऱ्या सेटमध्ये दणदणीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेकरीता आपले स्थान पक्के करून भद्रावतीच्या तसेच लोकमान्य विद्यालयाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विजेत्या व्हॉलीबॉल संघामध्ये साहिल पिंपळकर, अथर्व रणदिवे, हर्षित कवाडे ,सुजल जट्टलवार, सोहम खिरटकर,यश पिंपळकर, निशांत नगराळे, आदित्य रणदिवे, मोहित मारोटकर ,यश पाटील, अथर्व क्षीरसागर, अरमान अली, या खेळाडूंचा सहभाग होता. विजयी संघाचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार, प्रतिक नारळे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते,खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल चटकी, प्रवीण झाडे, आदर्श आसुटकर यांना दिले.
Comments
Post a Comment