भद्रावती विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी कर्जमाफी पासून वंचित

वरोरा 
चेतन लुतडे 

भद्रावती विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे. त्यांत्ता त्वरित कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात टाकण्यात यावी . त्याचप्रमाणे २०२३ व्या सोयाबीन आणि कापूस चना या पिकांच्या पीक विम्याची रक्कम शेतकन्यांच्या बैंक खात्यात टाकावी.
व या विधानसभा क्षेत्रातील कंपन्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यात द्यावा या मागणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळीवेळी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु सरकारने कर्जमाफी व पीक विम्याची रक्कम शेतकन्यांना देण्याबाबत घोषणा करून सुद्धा शेतक-यांना लाभ मिळाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात राज्यात सततची नापिकी व कर्जाचा वाढता भार असहाय झाल्याने शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत  असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकन्यांना दिलासा मिळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. 
दरम्यान वरोरा भद्रावती या क्षेत्रातील जवळपास १ हजार शेतकरी या कर्जमाफी योजनतेतून पात्र असतांना सुद्धा ते या कर्जमाफी पासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते. व राज्यात जवळपास लाखापेक्षा जास्त शेतकरी वंचित राहिले होते. या संदर्भात आपल्या शिंदे सरकारने मागील अधिवेशनात या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकयांची कर्जमाफी करू अशी घोषणा करून तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक यांना या संदर्भात याद्या तयार करण्याचे निर्देश दिले होते . परंतु आजपर्यंत यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. शिवाय मागील वर्षीच्या (२०२३) पीक विम्याचे जवळपास  25टक्के पात्र शेतकत्यांना पैसे मिळाले. नाही दरम्यान ते पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या बैंक
खात्यात टाकावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. पण तारखा वर तारखा विमा कंपनीच्या एजंट द्वारे देण्यात येत आहे. वरोरा भद्रावती या तालुक्यात असलेल्या सगळ्याच कंपन्यामध्ये स्थानिक मराठी भूमिपुत्राना नौकत्या देण्यात येत नसून बाहेरील प्रांतातील लोकांचा भरणा इथे मोठ्या प्रमाणात होतं असल्याने स्थानिकावर अन्याय होत आहे.

 या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असताना सुद्धा या सर्व कंपन्यावर प्रशासन कार्यवाही करायला तयार नाही. त्यामुळे मनसे कडून नाईलाजास्तव खळखट्याक आंदोलन करावे लागेल अशी चिन्हे दिसत आहे. त्यामुळे आपण येत्या १० दिवसात आमच्या मागण्या संदर्भात गांभीर्याने विचार करून शेतकयांना कर्जमाफी व पीक विम्याचे पैसे आणि स्थानिक कंपन्यात मराठी युवकांना रोजगार द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते राजू कुकडे यांनी दिले आहे.

Comments