गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर

“गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर बातमी:28/4/26 वरोरा : “गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोरा शहरात विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने गौमाता संरक्षण, सेवा व सन्मान यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांनी एकत्र येत वरोरा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गौमातेला भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय स्थान असल्याचे सांगत तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निवेदनात राज्य व देशात गौहत्या बंदी अधिक कडक करणे, गोरक्षणासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणी करणे, गौमातेला “राष्ट्रमाता” दर्जा देण्याचा विचार करणे, भटक्या व निराधार गाईंसाठी निवारा व संगोपन केंद्रे वाढवणे तसेच शेतकऱ्यांना गाईंच्या संगोपनासाठी आर्थिक मदत व योजना उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

आयुध निर्माणी चांदा येथे "शस्त्र उत्पादनांचे प्रदर्शन" चे आयोजन*

*आयुध निर्माणी चांदा येथे "शस्त्र उत्पादनांचे प्रदर्शन" चे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
            'म्युनिशन्स इंडिया लिमिटेड'च्या स्थापना दिनानिमित्त आयुध निर्माणी चांदा या वसाहतीत असलेल्या सार्वजनिक सभा भवनात ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा निर्मित विविध शस्त्रास्त्र उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि.१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार असून हे प्रदर्शन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. बुधवारी  हे प्रदर्शन बुधवार दि .०२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि ऑर्डनन्स फॅक्टरी हा क्रॉसबो, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बनवणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या युनिट्सपैकी एक आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भारतीय सशस्त्र दलांना विविध प्रकारचे दारूगोळा, क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि टँक माइन्स पुरविते.  ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा द्वारे परदेशात देखील दारूगोळा निर्यात केला गेला आहे.


Comments