पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेचा द्वितीय क्रमांकाने गौरवतालुकास्तरावर २ लक्ष रुपयांचे बक्षीसमुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा

पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेचा द्वितीय क्रमांकाने गौरव
तालुकास्तरावर २ लक्ष रुपयांचे बक्षीस
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर २२ सप्टेंबर - भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेस तालुक्यातुन द्वितीय क्रमांकाचे बक्षीस याअंतर्गत २ लक्ष रुपयांचा धनादेश शाळेस प्राप्त होणार आहे.  
    भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यात राबविण्यात आले. या अभियानात राज्यातील हजारोच्या संख्येने शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शासकीय आणि खासगी शाळांचाही समावेश होता. शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शासनाचा उद्देश होता. या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, महापालिका स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
    विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. अभियानाचा हाच उद्देश लक्षात घेऊन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यश मिळविले आहे.मिळालेल्या बक्षीस रकमेचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी नागेश नित यांनी दिली.

Comments