*पुरामुळे नाल्याची दैनवस्था, शेतकऱ्यांचे हाल.*
वरोरा
जळका
वरोरा तालुक्यातील, जळका या गावाच्या शिवारामध्ये गावाच्या थोड्या अंतरावर शेताकडे जाण्याच्या मार्गावर एक नाला आहे. पाण्याच्या पुरामुळे नाल्याच्या आजू बाजूला असलेली माती पूर्ण खचल्या गेली. शेतकऱ्यांना नाल्यामधुन जाण्याकरिता सिमेंट ढोले पण इतरात्र वाहून जाऊन नाल्यातून जाण्यायोग्य असणारा मार्ग पूर्णतः विस्कळीत झाला आहे. शेतामध्ये जाणारे शेकडो शेतकऱ्यांचे हाल होत आहे. बैलगाडी सुद्धा या रस्त्याने नेता येत नाही. आता हा रस्त्यातील नाला अत्यंत खराब झाल्याने शेतकरी लोकांची जीवितहानी कधीही होऊ शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तसेच या क्षेत्रातील जन प्रतिनिधिनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. शेकडो शेतकऱ्यांची समस्या असल्याने हा नाला तात्काळ दुरुस्त करून जाण्यायोग्य कायमस्वरूपी पूल बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे. प्रशासनाने आमची हाक कानावर घ्यावी अशी विनंती जळका गावातील सर्व शेतकरी बांधव करीत आहे..
Comments
Post a Comment