किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाने अभिजीतचे प्राण वाचले.

किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाने अभिजीतचे प्राण वाचले.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील दहा किलोमीटर अंतरावर असाळा गावात राहणाऱ्या गावकरी विद्यार्थ्यांचे किशोर डुकरे यांच्या प्रयत्नाने प्राण वाचले.

आसाळा येथील रहिवाशी अभिजित लक्ष्मण आसुटकर या विद्यार्थ्याला डेंगू आणि मलेरिया झाला होता. त्याची प्रकृती अति नाजूक असल्याने चंद्रपूर येथील हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार सुरू होते. यादरम्यान डॉक्टरांनी रक्ताची सक्त गरज असल्याची माहिती दिली. चंद्रपूर येथील ब्लड बँक मध्ये रक्त घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र कुठेही रक्त बॉटल मिळाली नाही. अशावेळी गावातील गावकरी म्हणून किशोर डुकरे यांनी प्रयत्न सुरू केले. 
डुकरे यांच्या संपर्कात असणारी नागपूर येथील अमन ब्लड बँकचे  प्रभारी राहुल भोयर यांना त्वरित फोन करून संबंधित रक्तगटाची मागणी केली. परंतु संबंधित रक्तगट यावेळेस ब्लड बँक कडे उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत भोयर यांनी किशोर डुकरे यांना फोन करून त्वरित दुसऱ्या ब्लड बँक कडून  रुग्णास रक्त देण्यास सांगितले. त्याबाबतचे सर्व पैसे अमन बँक चे राहुल भोयर यांनी रुग्णाच्या फोन पे द्वारे पाठवून मदत केली. त्यामुळे एक गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे प्राण किशोर भाऊ डुकरे आणि राहुल भोयर यांच्या  प्रयत्नाने वाचवले. यानंतर लगेच डॉक्टरांनी संबंधित रक्तगट चढवून रुग्णाचे प्राण वाचवले. 
दरवर्षी वाढदिवसानिमित्त किशोर डुकरे रक्तदान शिबिर आयोजित करीत असतात. याचाच फायदा ब्लड बँक गरीब, गरजू लोकांना रक्तपुरवठा करीत असते. मात्र रक्तपिढित  रक्त नसल्यास स्वतःच्या जवळचे पैसे खर्च करून दुसऱ्यांकडून रक्त घेऊन देतात. अशा रक्तपेढींना रक्तदान करणे आवश्यक असल्याचे मत डुकरे यांनी व्यक्त केले.

 अभिजित आसाळा येथे घरी परत आला त्यावेळेस आप्तपरिवार व मित्र मंडळातर्फे किशोर डुकरे आणि राहुल भोयर सह मदत करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीचे उत्तम उदाहरण आसाळ गावात पाहायला मिळाले.

Comments