संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती.

संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती.

वरोरा 
फक्त बातमी 

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखला जातो. तसेच यवतमाळ जिल्हात देखील अनेक कोळसा खानी अस्तित्वात आहेत. चंद्रपूर शहरात स्टील प्लँट देखील आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या पदी निवड झाल्याने चंद्रपूर शहर महाराष्ट्रातील कोळसा खान व स्टील संदर्भातील समस्यांचे निराकरण होईल असा विश्वास सामान्य नागरीकांना आहे. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे देखील या समितीच्या सदस्य पदी होते, हे विशेष. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नियुक्तीने चंद्रपूर जिlल्ह्यातील खासदाराला सलग दोन वेळा संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या सदस्य पदाचा बहुमान मिळाला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नियुक्तीचे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल केंद्र सरकार चे आभार मानले आहे.

Comments