समाजकारण हाच वसा , हाच वारसा...
शिवसेनेची रुग्णसेवा अविरत सुरूच राहणार. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे.
वरोरा
चेतन लुतडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख, रवींद्र शिंदे यांचेसह पक्षाचे पदअधिकारी व शिवसैनिक सतत गरीब, गरजू लोकांच्या मदतीला धावून जात असतात. शिवसेनाप्रमुख हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 80% समाजकारण व 20% राजकारण यांच्या आदर्श मूल्यावर सतत कार्य सुरु आहे.
बालाजी देवगण पुरटकर रा. दहेली (लावरी) ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांची आई गीताबाई देवगण पुरटकर यांचा हात अपघातात मोडला होता त्यावर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय “ शिवालय” येथुन त्यांना सतत मदत करण्यात आली. दि.१२/०८/२०२४ ला त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांना सुट्टी होतात त्यांनी प्रथम शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यलय “शिवालय” येथे येवुन प्रथम शिवालयातील आई तुळजा भवानी चे दर्शन घेतले व हिंदवी स्वराज्याचे सस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवदना करुन शिवसेनाप्रमुख वंदनिय हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करुन सर्वाचे आभार मानले.
“शिवालय” कडुन त्यांना त्याचे दहेली (लावरी) ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर या गावी जाण्याकरिता वरोरा येथील शिवसेना पक्षाचे वाहन *शिवालाय* त्याना जाण्याकरिता उपस्ब्ध करुन देण्यात आले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख, रवींद्र शिंदे यांनी भविष्यात आरोग्य विषयी कोणतीही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन सुध्दा जिले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यलय “शिवालय” येथुन झालेल्या मदतीने त्या भारावून गेल्या व त्यांनी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे केलेल्या सहकार्यामुळे माझ्यात व माझ्या परिवारामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे मी लवकरच उपाचरावर मात करु शकले अशी मत व्यक्त करीत शिवसेना कार्यातील सर्व पदअधिकारी व व्यवस्थापन कर्मचारी यांना भविष्यात असेच कार्य करीत रहा अश्या शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment