निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात "व्यक्तिमत्व विकास" यावर व्याख्यानाचे आयोजन*

*निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात "व्यक्तिमत्व विकास" यावर व्याख्यानाचे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती- 
                 स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात  "व्यक्तिमत्व विकास" या विषयावर व्याख्याते श्रीमत स्वामी ज्ञानगम्यनंदजी महाराज, रामकृष्ण मठ, नागपूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रमुख अतिथी व व्याख्याते श्रीमत स्वामी ज्ञानगम्यनंदजी महाराज, रामकृष्ण मठ, नागपूर , श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाआश्रम, भद्रावती चे सचिव कुमुद रंजन विश्वास, पदाधिकारी व प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते श्रीमत स्वामी ज्ञानगम्यनंदजी महाराज, रामकृष्ण मठ, नागपूर यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे उत्तमरीत्या समजावून सांगितले तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी  सवयी, कृती आणि विचार यांचे महत्त्व काय आहे हे विविध उदाहरणामार्फत समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आयुष्यासाठी व्यक्तिमत्व किती आवश्यक आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजेंद्र बेदरे  तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कुलदीप भोंगळे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी  करण्याकरिता  प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, श्री खुशाल मानकर यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments