गावातील गरीब लोकांनी नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खूटेमाटे यांना दिले आशीर्वाद.
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा भद्रावती मतदारसंघात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खूटेमाटे यांना गरीब लोकांचे आशीर्वाद लाभत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून गरजू व गरीब जनतेमध्ये जाऊन डोळ्या संबंधित आजारावर प्रभावी काम करीत आहे. शेकडो कॅम्प स्वतःच्या खर्चातून राबवून जनतेचे आशीर्वाद ते जमा करत आहे. त्यामुळेच फार कमी वेळात डॉक्टर खुटेमाटे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिक्षित उमेदवार म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. विधानसभेच्या सर्वे मधील सामाजिक कामात प्रथम क्रमांक खूटेमाटे यांचा लागला असून राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील असा अंदाज जनतेतर्फे बांधला जात आहे.
चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोरा भद्रावती मतदरसंघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे , मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन , प्रेरणेतुन प्रगति , असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात यश आले आहे. या मोहिमे अंतर्गत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतु चिकणी येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीराला चिकणी, बोपापूर, खापरी, टाकळी, डोंगरगाव, शेगाव, खरवड, गौळ, नागरी, केळी, महाडोळी, वाघनख,या गावातील १०१२ नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सुरेश माथनकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे, प्रमुख पाहुणे म्हणून जर्नादन देठे,किशोर झाडे,संगिता खारकर,आनंदराव दातारकर, पंढरी बुचूंडे, नरेंद्र माथनकर, पंढरी देहारकर, सुनिल येळेकर, नथ्थुजी गावंडे,मेघश्याम बोधे,रामभाऊ येडेकर,खिरटकर महाराज,गजानन येळेकर,सुरेश साळवे,प्रणिल खंगार हे मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सुधाकर खरवडे, संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन संदिप सोनेकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम प्रविन वासेकर,विजय झाडे,विठ्ठल भेदुरकर,मारोती जवादे,विलास घाईत,ताराचंद बोरेकर,मारोती कुत्तरमारे,सुनिल डोंगरे,रंजना भुसारी,अनुप खुटेमाटे,सचिन खुटेमाटे,महेश आस्कर यांनी अथक प्रयत्न केले.
Comments
Post a Comment