चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ वरोरा तालुकाध्यक्ष चेतन शर्मा यांचा सत्कार दिनेश दादापाटील चोखारे यांनी भेट घेत दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिनेश दादापाटील चोखारे यांनी भेट घेत दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
चंद्रपूर :
वरोरा येथील सोना- चांदीचे व्यावसाईक तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चेतन चंदनलाल शर्मा यांची चंद्रपूर जिल्हा कुस्तीगर संघाच्या कार्यकारीणी निवड झाल्यानंतर नुकतीच जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी भेट घेऊन सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांचे वतीने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत असून नुकतीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे निवडणुक निरीक्षक अनिलजी पांडे यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली असे माहित झाल्यावर त्यांची घरी जाऊन भेट घेतली. चर्चा केली. आणि त्यांच्या निवडीबद्दल सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चेतन शर्मासह, त्याचे वडील चंदनलाल शर्मा, बंधु नितीन शर्मा यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment