"प्रेरणेतून प्रगती “ : “चला बदल घड़वुया “ अंतर्गत विद्यार्थी , युवा मार्गदर्शन प्रचंड यशस्वीपणे संपन्न .
"प्रेरणेतून प्रगती “ : “चला बदल घड़वुया “ अंतर्गत विद्यार्थी , युवा मार्गदर्शन प्रचंड यशस्वीपणे संपन्न .
शिक्षण हे समाजाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे साधन आहे. विठ्ठल कांगणे सर
वरोरा 17/9/2024
चेतन लुतडे
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी , युवकांच्या शैक्षणिक , सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित "प्रेरणेतून प्रगती" हा विशेष कार्यक्रम काल प्रचंड उपस्थितित पिपरडे सभागृह भद्रावती येथे यशस्वीपणे पार पडला.
शिव महोत्सव समितीच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. विठ्ठल कांगणे सर तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या 'चला बदल घडवूया' या मोहिमेच्या अंतर्गत करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनातील प्रवासात यश मिळवण्यासाठी योग्य दिशा व दृष्टिकोण कसा मिळवावा , स्पर्धा परीक्षांमधील संधी कशा साधाव्यात आणि शिक्षणाचे खरे महत्त्व काय आहे यावर या कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
विठ्ठल कांगणे सरांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने उभे राहात ,भविष्याच्या आव्हानांना कसे सामोरे जावे याबाबत प्रगल्भ विचार मांडले. त्यांनी शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून, समाजाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विशेषतः विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील उपलब्ध संधी, विद्यार्थ्यांनी आपले अध्ययन कसे सुधारावे, तसेच त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व कसे आहे, यावर विशेष भर देण्यात आला.
डॉ. चेतन खुटेमाटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने प्रोत्साहित करत व प्रगतिसाठी प्रेरणा गरजेची आहें असे समजावत , यशप्रप्तिसाठी युवकाना सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्र्थी व युवकानी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देत या कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत नव्या आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करणारा नक्किच ठरेल असा आशावाद उपस्थितानीं व्यक्त केला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे ,उद्घाटक प्रा. डॉ. दिलीप चौधरी. प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट भूपेंद्र रायपुरे, डॉ. सचिन भेदे, डॉ. भाऊराव खुटेमाटे,, प्रफुल चटकी, योगेश मत्ते ,डॉ. कवडू खुटेमाटे, एन. एस. वाळवे सर , मांडवकर सर, डॉ. योगेश गेडाम, शहिस्ता पठाण, वणीता ताई घुमे, आशिष देहारकर, अशोक येरगुडे, पुरुषोत्तमजी मत्ते, रेखाताई खुटेमाटे, डॉ. विजय गिरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पिंगे, विनोद थेरे, अनुप खुटेमाटे, प्रकाश पिपलकर , सचिन खुटेमाटे, अनुप पावडे, सौरभ पिदूरकर, संजय चिडे, निलेश खुटेमाटे, अनिल डोंगे, महेश आस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संतोष कुचनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष भोयर यांनी व्यक्त केले.
----------------------------------------------
Live Chandrapur थेट प्रक्षेपण, गणपती विसर्जन
Comments
Post a Comment