खासदार प्रतिभाताई धानोरकर
वरोरा
चेतन लुतडे
चंद्रपूर आर्णि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून महाराष्ट्रातील तमाम जनतेची दुःख विघ्नहर्ता दूर करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
मागील दहा वर्षापासून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या राहत्या वरोरा येथील घरी रिती रिवाजानुसार गणपतीची स्थापना श्रद्धेने करण्यात आली. यावेळी त्यांचे बंधू दोन मुले आणि आप्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महाराष्ट्रात गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त आप्तपरिवार, मित्र एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा हा सण सामाजिक बांधिलकी जपतो . या सणानिमित्त लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी ,कामगार बंधू, राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेवो ,क्षेत्रातील सर्व मतदार यांचे सर्व दुःख विघ्नहर्ता पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सर्व जनतेला दिल्या आहेत.
Comments
Post a Comment