खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

रविवारी चंद्रपुरात संविधान सन्मान महोत्सवाचे उद्घाटनरामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार, राकेश सिन्हा, प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती गोंडवाना विद्यापीठाचे आयोजन

रविवारी चंद्रपुरात संविधान सन्मान महोत्सवाचे उद्घाटन

रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार, राकेश सिन्हा, प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती

 गोंडवाना विद्यापीठाचे आयोजन

अकूंश अवथे 

 पत्रपरिषदेला संबोधित करताना डॉ. अनिल हिरेखण, तर शेजारी डॉ. प्रमोद काटकर, दिलीप चौधरी, डॉ. मिलिंद भगत, निलेश बेलखेडे, डॉ. शिला नरवाडे, संजय रामगिरवार.

चंद्रपूर, 19 सप्टेंबर

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात होत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी येथे दिली.
सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप चौधरी, डॉ. मिलिंद भगत, निलेश बेलखेडे, डॉ. शिला नरवाडे, संजय रामगिरवार आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून, उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य राकेश सिन्हा व खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांचीही यावेही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महोत्सवाचे नियोजन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण व संविधान सन्मान महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संविधानाच्या जनजागृतीसाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. हा महोत्सव 26 जानेवारी 2025 पर्यंत साजरा करण्यात येणार असून, विद्यापीठस्तरावर दोन दिवसीय संविधान साहित्य संमेलन तसेच समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असेही हिरेखण यांनी यावेळी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने साजरा होणार्‍या या संविधान सन्मान महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
==========

Comments