उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान*

*उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान* 

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 5 : शिक्षक दिनानिमित्त जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्मवीर कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गिरीश धायगुडे उपस्थित होते .  
सदर कार्यक्रमात प्राथमिक विभाग या  क्षेत्रामधून 15 तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षकांचे  शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, आणि सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग विशेष कला शिक्षक पुरस्कार या क्षेत्रामधून बालाजी भीमराव सोळंके यांचाही सत्कार करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी  सोनवणे,  शिक्षणाधिकारी (माध्य) निकिता ठाकरे,   उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निवास कांबळे तसेच शिक्षण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
*पुरस्कार प्राप्त शिक्षक* : जगदीश मेहर (जि.प.उ.प्रा. शाळा तुजनमाल, ब्रम्हपुरी), वंदना बोढे (जि.प.उ.प्रा. शाळा चारगाव, भद्रावती), राजानंद दुधे (जि.प.उ.प्रा. शाळा सिदूर, चंद्रपूर), कविता लोथे  (जि.प.उ.प्रा. शाळा कवडशी (डाक), चिमूर), गणेश आसेकर (जि.प.उ.प्रा. शाळा चेकलिखितवाडा, गोंडपिपरी), प्रशांत कवासे (जि.प.उ.प्रा. शाळा गडीसुर्ला, मुल), नरेंद्र वासनिक (जि.प.उ.प्रा. शाळा नवेगाव हुंडेश्वरी,नागभिड),  दिलीप मडावी (जि.प.उ.प्रा. शाळा  धिडसी, राजूरा), महेंद्र खोब्रागडे (जि.प.उ.प्रा. शाळा नाचणभट्टी, सिंदेवाही), मनीषा चवले (जि.प.उ.प्रा. शाळा बोरगाव (शि),वरोरा), गोविंद पेदेवाड (जि.प.उ.प्रा. शाळा लालगुडा, कोरपना), रामलाल पमार (जि.प.उ.प्रा. शाळा चकपिरंजी, सावली), किसन अलाम (जि.प.उ.प्रा. शाळा मानोरा, बल्लारपुर),  सुलक्षना गायकवाड (जि.प.उ.प्रा. शाळा  मोहाडा (रै), पोंभूर्णा), नागनाथ बोरुळे  (जि.प.उ.प्रा. शाळा  आंबेझरी, जिवती) तर दिव्यांग/ विशेष /कला शिक्षक पुरस्कार गटातून बालाजी सोळंके (जि.प.उ.प्रा. शाळा  पुडियाल मोहदा, जिवती.

Comments