वरोरा
चेतन लुतडे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात निषेध नोंदवल्या जात आहे.
राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यावर असताना आरक्षणाबाबत वक्तव्य करत काँग्रेस सरकार आल्यास आरक्षण संपवून समानता आणण्याचा विचार प्रकट केले होते. या वक्तव्याचा संपूर्ण भारतात निषेध व्यक्त होत असून याचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी काळ्या फिती लावून भव्य मोर्चा काढून भद्रावती विधानसभेत जाहीर निषेध नोंदवला आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना आरक्षण हा संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भाग आहेत याचा विसर पडल्याची खंत व्यक्त करत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा निषेध नोंदविला . बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीतील समानतेचा अधिकार म्हणून आरक्षण दिले होते. त्याच बाबासाहेबांना संसदेमध्ये येण्यापासून रोखण्याचा दोनदा काँग्रेसने प्रयत्न केले. नेहरू पासून राहुल गांधीपर्यंतच्या काँग्रेस सरकारने आरक्षण संपवण्याचा विचार वारंवार केला आहेत. अशा विचारसरणीचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, संविधान विरोधी काँग्रेसचा निषेध असो, आरक्षण बाबत वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो. अशा घोषणा देत वरोरा भद्रावती विधानसभेत शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment