*मांगली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या**शेतातील गोठ्यात घेतला गळफास*

*मांगली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या*

*शेतातील गोठ्यात घेतला गळफास*

*भद्रावती येथे महिलेची घरातच गळफास घेऊन आत्महत्या*


अतुल कोल्हे भद्रावती :-
               तालुक्यातील मांगली येथील एका युवकाने गावालगत असलेल्या आपल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मांगली येथे दिनांक ७ रोज शनिवारला घडली. ऋतिक विजू चौधरी, वय २२ वर्षे, राहणार मांगली. असे मृतक युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाही केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
-----------------------

*भद्रावती येथे महिलेची घरातच गळफास घेऊन आत्महत्या*

 भद्रावती 
             शहरातील  एका ४२ वर्षे महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७ रोज शनिवारला शहरातील जुना सुमठाणा येथे घडली.  आम्रपाली संजय ब्राह्मणे, वय ४२ वर्षे, राहणार सुमठाना, भद्रावती असे या मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. घरातील सर्व लोक खाली असताना वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन सदर महिलेने आत्महत्या केली. ही घटना घरच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर भद्रावती पोलीसांनी  घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.


Comments