महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने बांधलेला बंधारा फूटला.

महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने बांधलेला बंधारा फूटला.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील अंभोरा (दिंदोडा) या परिसरातील मृद व जलसंधारण विभागाने बांधलेला सिमेंट बंधारा सततच्या पावसामुळे बंधाऱ्याच्या बाजूला कमजोर जागेवरून फुटला आहे.<br>29.26 लक्ष रुपयाचे बांधकाम एका सोसायटी मार्फत चंद्रपूर येथील कॉन्ट्रॅक्टर यांनी या बंधाऱ्याचे बांधकाम केले होते. <br>20 /5/ 2023 रोजी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू झाले होते यानंतर एप्रिल 2024 ला हे बांधकाम पूर्ण झाले याबाबतचा फलक या ठिकाणी लागलेला आहे. या ठिकाणी असलेले शासकीय अभियंत्याला संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments