शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे जलसमाधी आंदोलन


शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे जलसमाधी आंदोलन 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील भटाळा या गावात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेत अनोखे आंदोलन केले. यावेळी शेगाव येथील पोलीस ठाणेदार जाधव व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भटाळा या गावातील मामा तलावाची दुरुस्ती करण्यात यावी. आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजून पर्यंत आले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना फोन करून पैसे आल्याची बातमी दिली. परंतु काही शेतकऱ्यांना पैसे अजून पर्यंत मिळालेच नाही त्यामुळे ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे सांगत पोलीस स्टेशन शेगाव येथे गुन्हे नोंद करण्याचे निवेदन किशोर डुकरे यांनी दिले आहे.

शेगाव पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, शाखा अभियंता मुत्तलवार साहेब, व शेतकरी अनिल चौधरी, प्रकाश तुमसरे, विठ्ठल दानव, संदिप वासेकर, विशाल मोरे, सुधाकर डुकरे, प्रसाद मिलमिले, अनाजी देवगडे, शंकर जांबुडे, राजू जांभुळे, विठ्ठल मौजे, व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Comments