पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

पिसाळलेल्या कुत्र्याला दुर्दैवी अंत ; टिळक वार्ड येथील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष टिळकवार्ड,वरोरा, दि. २४ मार्च : शहरातील टिळकवार्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी हॉटेलवरून येणाऱ्या व्यक्तींना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर गेल्या रविवारी वैभव किराणा दुकानाजवळ फिरत असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याचा दुर्दैवी अंत झाला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून हा कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांना चावा घेत होता. पंधरा ते वीस व्यक्तींना व लहान मुलांना गंभीर जखमी केल्याने परिसरात लहान मुलांना खेळणेही अवघड झाले होते. विशेष म्हणजे या कुत्र्यांच्या शरीरावरील कातडी गळून पडल्यासारखी दिसत असून, त्यांना आजार झाले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड असून, अशा कुत्र्यांमुळे एखाद्या लहान मुलावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनान...

*28 सप्टेंबर रोजी महिला मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल**Ø वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत बंद*

*28 सप्टेंबर रोजी महिला मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*

*Ø वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत बंद*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर दि. 27 : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून चांदा क्लब ग्राउंड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये अंदाजे 5 हजार महिला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मेळावा असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत  चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी आदेश निर्गमीत केले आहे.

            वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग 28 सप्टेंबर 2024 रोजी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजतापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हा “नो पार्कींग झोन” व “नो हॉकर्स झोन”  म्हणून घोषित करण्यात येत आहे.    

          दरम्यानच्या काळात पडोली कडून शहरामध्ये जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज - जटपुरा गेट या मार्गाचा किंवा सावरकर चौक- बस स्टॉप – प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट या मार्गाचा वापर करतील. 

          वरिल निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले आहे.

०००००

Comments