वरोरा भद्रावती मॅरेथॉन 2024 चे आयोजन प्रसिध्द नेत्रचिकीत्सक डॉ .चेतन खुटेमाटे यांच्या चला बदल घडवुया या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन.

वरोरा भद्रावती मॅरेथॉन 2024 चे  आयोजन 

प्रसिध्द नेत्रचिकीत्सक डॉ .चेतन खुटेमाटे यांच्या  चला बदल घडवुया या  उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन. 

वरोरा २/9/2024
चेतन लुतडे 
 
डॉक्टर चेतन खोटेमाटे यांच्या चला बल घडवूया या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय मॅरेथॉन क्रीडा स्पर्धेचे आयोजन वरोरा- भद्रावती दरम्यान घेण्यात आली.
14 , 18 वर्षाच्या आतील व खुल्या गटातील स्त्री आणि पुरुषा करिता ही स्पर्धा घेण्यात आली. लाखो रुपयांचे  पारितोषिके या स्पर्धेच्या दरम्यान वितरित करण्यात आली.
वरोरा , भद्रावती क्षेत्रातिल खैळाडुना प्रोत्साहन मिळावे ,  खेळाच्या माध्यमातुन जनजागृति व्हावी हा प्रामाणिक प्रयत्न घेऊन , सामाजिक मानसिक्तेत सकारात्मकता यावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
या स्पर्धेमध्ये २५२ युवती , ३४७ युवक यानी आपला सहभाग नोंदवीत होता. ही स्पर्धा  2 किमी , 5 किमी अंतरादरम्यान धावपटू साठी घेण्यात आली. यावेळी शहरातील मान्यवरांसह धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते  36 उत्कृष्ट धावपटूंना सन्मानित करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी  संयोजक डाॅ.चेतन खुटेमाटे,मारोती मोरे, रुपलाल कावडे, खेमराज कुरेकार, प्रा.प्रविण खिरटकर,डाॅ.राठोड मान्यवर उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवकांची ऊर्जा सामाजिक स्वास्थाकरिता सुदृढ ठरणार असून राष्ट्रबांधणीसाठी स्वस्थ युवकांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत वरोरा भद्रावती क्षेत्रातील  युवकांनी भविष्यात भारतासाठी ओलंपिक मेडल्स मिळविण्याचा प्रयत्न करावा. असा मानस स्पर्धेचे आयोजक डॉ चेतन खुटेमाटे  यांनी ज़ाहिर  करीत भविष्यात अशा युवकांसाठी ठोस मदत करण्याची आश्वासन युवकांना दिले.

स्पर्धेचे आयोजन आनंद निकेतन महाविद्यालया चे प्रा.तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली  शहरातील क्रीडा स्वयंसेवक तथा चला बदल घडवूया च्या कार्यकर्त्यां द्वारे करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन राहुल तायडे यांनी केले. 

स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्या करिता संदिप सोनेकर,चंद्रशेखर झाडे,संकेत गोहकर,उल्हास बोढे,विशाल मोरे,व्यंकटेश खटी,सुर्दशन घागी,स्वप्निल टाले,विठ्ठल भेदुरकर,विजय झाडे,अनुप खुटेमाटे,मेहुल शेगमवार,निलेश पिंगे,राहुल ताजणे,सचिन खुटेमाटे,प्रविण वासेकर,तुषार कडू,सतिश परचाके यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments