पंचायत समिती वरोरा व भद्रावती अंतर्गत घरकुल योजनेचे 1750 प्रस्ताव धूळ खात. प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रश्नचिन्ह.
प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रश्नचिन्ह.
वरोरा
चेतन लुतडे
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा -भद्रावती पंचायत समिती अंतर्गत एन टी प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबविण्यात येते. याबाबत पंचायत समिती वरोरा व भद्रावती अंतर्गत ग्रामपंचायतीने एन टी प्रवर्गातील लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले आहे . पंचायत समितीने १७५० लाभार्थ्याचे प्रस्ताव संबंधित कार्यालयाला सादर केले आहेत .परंतु अजुनपर्यंत वरिष्ठ स्तरावरुन या लाभार्थ्यांच्या घरकुल संबंधाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे संबंधित लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपला रोष व्यक्त करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा , ब्रह्मपुरी सावली, सिंदेवाही 3522 पंचायत समितीतील ग्रामपंचायतीला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेच्या लाभासाठी पंचनामे होऊन त्यांना लाभ प्राप्त झालेला आहे.
त्याच धर्तीवर वरोरा व भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येणा-या ग्रामपंचायतीतील एन टी प्रवर्गातील गरजु लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा.
या आशयाचे निवेदन ग्राम संवाद संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चिकटे व पुरुषोत्तम पावडे वरोरा तालुका अध्यक्ष ,नयन जांभुळे भद्रावती तालुका ,अध्यक्ष ग्राम संवाद संघटना प्रविण भोयर सरपंच वनली ,राजुभाऊ डोंगे संचालक कृ. उ बा भद्रावती ,अरुण बरडे उपसरपंच पिजदूरा धनराज पायघन सरपंच मांगली ,संजय घागी माजी संचालक वरोरा दिनेश कष्टी संचालक कृ. उ बा वरोरा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिले आहे.
मात्र गेल्या वर्षीपासून या फाईल अशाच धूळ खात आहे. त्यामुळे ग्रामसंवाद सरपंच संघ न्यायालयात पिटीशन दाखल करणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी सांगितले.
ग्रामीण लाभार्थी
जनप्रतिनिधीचे निवेदन घेण्यासाठी अधिकाऱ्यांना खुर्चीवरून उठण्याचा वेळ सुद्धा नाही इतके कामे त्यांच्याजवळ असल्याने वरोरा भद्रावती क्षेत्रातील लाभार्थी वंचित राहिले असेल अशी टीका ग्रामीण लाभार्थ्याकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment