वरोरा:-हरीश केशवाणी.
दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात TDRF ने आपला सहभाग नोंदविला. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मा.श्रीमती शिवनंदा लंगडापुरे याच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले.या समारंभात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत TDRF जवानांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली.
ध्वजारोहण नंतर उपविभागीय अधिकारी वरोरा श्रीमती शिवनंदा लंगडापुरे
यांनी उपस्थित TDRF जवान व सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तसेच पत्रकारांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात तहसीलदार वरोरा योगेश कौटकर, न. प.मुख्य अधिकारी गजनान भोयर, पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे , TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान ज. सय्यद, TDRF ट्रूप कमांडर सुमित जुमनाके, वेदांत थाटे रंजीत देवतळे, आकांशा मांढरे, सुप्रिया बोरकर, मयुरी नंकिटे, हर्षदा मडावी, पवन वणकर, तृप्ती ठक, वैशाली काळे, नैतिक दाते, जानवी घोडमारे, तनुजा पायघान, तनु घोडाम, वंश नीकुरे, सृष्टी दाडमल ई. उपस्थित होते
--------------------------------------