लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल मुलाचा व मुलींचा संघ जिल्हास्तरावर*

*लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल मुलाचा व मुलींचा संघ जिल्हास्तरावर*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा 17 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा  संघ तालुकास्तरावर विजयी होऊन जिल्हा स्तरावर पोहोचला आहे.यानंतर चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत  लोकमान्य विद्यालयाचा हा संघ भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे. 17 वर्षाखालील या विजेत्या मुलांच्या संघामध्ये साहिल पिंपळकर, अथर्व रणदिवे, हर्षित कवाडे ,सुजल जट्टलवार, सोहम खिरटकर,यश पिंपळकर, निशांत नगराळे, मोहित मारोटकर ,यश पाटील, अथर्व क्षीरसागर, अरमान अली, आदित्य रणदिवे या खेळाडूंचा सहभाग होता.तर मुलींच्या संघामध्ये रिया खामनकर, तनुश्री शिवणकर, महेक सय्यद, खुशी प्रसाद , ऐश्वर्या माथनकर,चैताली पाठक, रमा रामटेके, श्रद्धा कपाट,खुषी महाकुलकर ,ईशा नक्षीने या खेळाडूंचा सहभाग होता.
  विजयी संघाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, प्रतिक्षा खुजे, रवींद्र नंदनवार, प्रतीक नारळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल चटकी, प्रवीण झाडे,आदर्श आसुटकर यांना दिले.

Comments