शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष भगवा सप्ताहात गरजुना सहकार्य

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष भगवा सप्ताहात गरजुना सहकार्य*

*गरजु रुग्णांना आर्थीक सहकार्य तर पितृछत्र हरविलेल्या मुलीला शैक्षणिक दत्तक घेतले*

वरोरा :
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह राबवीण्यात येत असून जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात कॅन्सर रुग्ण वामन ढोक, रुग्ण सरीता गायकवाड यांना आर्थीक सहकार्य तसेच पितृछत्र हरविलेल्या पिहु रुयारकर हिला शैक्षणक दत्तक घेण्यात आले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व सर्व शिवसैनिक (सर्व विंग) च्या शिवसैनिकांच्या व्दारा पक्षप्रमुख आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने दि.४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७५-वरोरा-भद्रावती तसेच ७०-राजुरा विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या कार्यालयातून भगवा सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय दादर मुबई वरुन प्राप्त सुचनानुसार पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे व पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, वरोरा विधानसभा सर्पकप्रमुख रितेश रहाटे, यांचे मार्गदर्शनात भगव्या सप्ताहामध्ये  नियोजनबध्द कार्यक्रम राबविल्या जात आहे. भगवा सप्ताह दुसऱ्या दिवशी खाबाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गरजुंना, रुग्णांना आर्थीक सहकार्य, पक्षाचे प्राथमिक सभासद नोंदणी, गावोगावी शहरी भागात प्रभागात प्रत्यक्ष भेटी असे कार्यक्रम राबवीण्यात येत आहेत.
वरोरा तालुक्यातील मजरा येथील रहिवासी सरीता शिवाजी गायकवाड हयांना फिट येण्याचा त्रास असून आर्थीक परिस्थतीने कुमकुवत असल्यामुळे एमआरआय उपचाराकरीता आर्थीक मदतीची आवश्यकता पडली. परिस्थीतीचे गांर्भीय बघता शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी असे सुचविले. याच अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथुन सरीता गायकवाड यांना तात्काळ आर्थीक मदत पुरविण्यात आली. 
भगवा सप्ताह पहिला दिवसाला वरोरा येथील कट्टर शिवसैनिक पदाधिकारी बालाजी रुयारकर यांचे अकस्मात निधन झाले.कुटुंबातील पत्नी शुभांगी व मुलगी पिहु उघडयावर पडले. रुयारकर कुटुंबाला एक हात मदतीचा देत जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी परिस्थीतीची दखल घेत पितृछत्र हरविलेल्या पिहु रुयारकर हया मुलीला शैक्षणिक दत्तक घेतले व पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच तालुक्यातील मोखाडा येथील कॅन्सर रुग्ण वामन संभाजी ढोक यांना उपचाराकरीता आर्थीक सहकार्य केले.
यावेळी वरोरा तालुका संघटीका सरलाताई मालोकर, शुभांगीताई धवने, मुक्ता हजारे व इतर महिला व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

Comments