अतुल कोल्हे भद्रावती :-
दिनांक 1 ऑगष्ट पासुन "महसुल पंधरवडा 2024" साजरा करण्यास शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2024 अंतर्गत दिलेल्या कार्यक्रमानुसार भद्रावती तालुक्यात 1 ऑगष्ट महसुल दिन शुभारंभ कार्यक्रम घेण्यात येवून साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे 1 ऑगष्ट दिनी "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" संबधात सर्व नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. व त्यांचे फार्म नारीशक्ती अॅपवर भरुन त्याना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच 2 ऑगष्ट ला "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" संबधात युवा व विदयार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर योजने संबंधात माहीती देवून त्यांचेकडुन योजनेची नोंदणी करण्यात आली. दिनांक 3 ऑगष्ट ला "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" या समंधात जेष्ठ नागरीक यांना सदर योजने अतर्गत तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी या सबंधात मार्गदर्शन व योजनेचा लाभ घेण्यास आव्हान करण्यात आले.
वरील प्रमाणे भद्रावती तहसिल अंतर्गत् तहसिलदार भद्रावती याचे वतीने कार्यक्रम घेण्यात आले. असे तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार मनोज आकनुरवार यांनी माहिती दिली. तसेच पुढील महाराष्टाचे शासन निर्णया नुसार महसुल पंधरवाडा साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment