नागरिक भूकंपाचे धक्के समजून घराबाहेर निघाले.
परिसरातील प्रदूषणामुळे माळढोकाचे अस्तित्व धोक्यात
उद्योगधंदे सोडून जाण्याच्या तयारीत.
वरोरा
चेतन लुतडे
जाहिरात
वरोरा शहरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे दिसत आहे. यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता ठोस असे कारण अजून पर्यंत मिळाले नाही.
वरोरा तालुक्यातील परिसरात कोळसा खदानीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकोना माईन्स सुरू झाल्यापासून आजूबाजूच्या परिसरात ब्लास्टिंग मुळे असे धक्के जाणवत असल्याचे समजत होते. परंतु आता वरोरा शहर हालायला लागले आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेला अजून पर्यंत धक्के जाणवले नाही हे विशेष .
आज मंगळवारी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी भूकंपासारखा आवाज झाल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले . याबाबतची काही महिने अगोदर एकोना माईन्स अधिकाऱ्याला विचारणा केली असता कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. मात्र दुपारी दोनच्या नंतर ब्लास्टिंग करत असल्याचा दुजोरा दिला होता. परंतु इतका मोठा ब्लास्ट आम्ही करत नाही असे उत्तर दिल्याने पत्रकार संतुष्ट झाले होते. शेजारील गावांमध्ये घरांना भेगा पडत असल्याचे नागरिकांनी बरेचदा बोलून दाखविले. मात्र याकडे दुर्लक्ष करत ब्लास्ट चे प्रमाण तीव्र होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे आजूबाजूच्या परिसरातील कापूस जिनिंग उद्योग बंद करून दुसरीकडे जाण्याच्या मार्गात आहे. नवीन पडलेले लेआउट मध्ये याच कारणामुळे प्लॉट खरेदी विक्री मंदावले आहे. शेतकऱ्यांनी शेती करण्याचे प्रमाण कमी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे माळढोक सारखे दुर्मिळ पक्षी या ठिकाणावरून प्रदूषणामुळे लुप्त झाले आहे. मात्र वनविभाग राखीव क्षेत्र म्हणून अनुदान मिळविण्यात धन्यता समजत आहे. पारस जिनिंग ,रवी कमल जिनिंग जवळ माळढोक अस्तित्वात असल्याचे बोलले जाते.
वरोरा शहरात इंग्रज काळात मोठमोठ्या खदानी बनवन्यात आल्या होत्या त्यानंतर थातूरमातूर बुजवण्यात आल्या. सहारा पार्क मध्ये अशीच एक विहीर राखीने बुजवण्यात आली होती.
याच पद्धतीचे सौम्य धक्के शहराला बसत राहिल्यास पोकळ भाग घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने या विषयाची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.
Comments
Post a Comment