*भद्रावती शहरातील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :-
आपल्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असताना ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 रोज बुधवार ला सकाळी 9.15 वाजता शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. ज्ञानेश्वर एकनाथ इंगोले, वय 50 वर्ष, राहणार शास्त्रीनगर, भद्रावती असे या मृत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
सदर मृतक हा गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा नेहमीप्रमाणे आपल्या एम एच 34 सीसी 7030 या क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी वृत्तपत्र वितरण करीत असताना उडान पुलाजवळ सी जी 04 पी एफ 14 97 या क्रमांकाच्या नागपूर वरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या केमिकल भरलेल्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली. यात ज्ञानेश्वर इंगोले यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
......................
Comments
Post a Comment