*चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिली उपचाराकरीता दिली आर्थिक मदत*
वरोरा
चेतन लुतडे
स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे उपक्रम श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत ट्रस्टचे संस्थापक तथा रविंद्र शिंदे चंद्रपुर जिल्हाप्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी चिकणी येथील धनश्री मनोज मेश्राम यांना उपचाराकरीता आर्थिक मदत करण्यात आली. धनश्री मनोज मेश्राम यांना गर्भपिशवीचा त्रास असुन त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखिची असल्याने त्यांना ट्रस्टच्या माध्यमातुन त्यांची आई संगिता मनोज मेश्राम यांच्या कडे आर्थीक मदत सुपुर्त करण्यात आली. याप्रसंगी वरोरा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, उपजिल्हा प्रमुख युवासेना शरद पुरी, उपशहर प्रमुख अभिजीत अष्टकार, जयश्री फाले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment