एकोना माईन्स मधून कोळसा चोरी उघडकीस; ५० टन कोळशाचा समावेश

एकोना माईन्स मधून कोळसा चोरी उघडकीस; ५० टन कोळशाचा समावेश वरोरा (दि. ०९ मार्च) – तालुक्यातील एकोना खाण क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात माजरी क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक (खाणकाम) व प्रादेशिक सुरक्षा अधिकारी सूरज करण बैरवा यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी रात्री ७.०० वाजता डिस्पॅच इंचार्ज मुकेश कुमार गजबीये यांनी चेक पोस्टचे आवक-जावक रजिस्टर तपासले असता त्यात खाडाखोड आढळून आली. याची माहिती मिळताच बैरवा यांनी जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांना कळवून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना मागविल्या. त्यानुसार राजेश करोले यांनी मुख्य संगणक सर्व्हरमधील फुटेजचे परीक्षण केले. फुटेजच्या पडताळणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.४२ वाजता एमएच-३४-बीजी-६१४७ ही गाडी अवारपूर सिमेंट वर्क्ससाठी कोळसा उचलण्यासाठी आत दाखल झाली. मात्र, नियमानुसार वजनकाट्यावर न जाता थेट कोळसा साठवणूक ठिकाणाहून कोळसा भरून ही गाडी सकाळी १०.५८ वाजता बाहेर पडताना आपला नंबर न वापर...

राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे : बंडू खारकर.

राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे  :  बंडू खारकर

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, मांगली, कोलामपूर, पिजदुरा, पाचगांव,  मोवाडा, काटेबाळा, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप

चंद्रपूर, दिनांक १६/०८/२०२४ 
अंकुश अवथे चंद्रपूर 

शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे भवितव्य घडवत असतो. म्हणून शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रगतशील रहावे स्वतः बरोबर समाज तसेच राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय ठेवावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडू खारकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, मांगली, कोलामपूर, पिजदुरा, पाचगांव,  मोवाडा, काटेबाळा, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये १४ ऑगस्ट २०२४ रोजी बुक व साहित्य वाटप करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक विकास दडमल, शिक्षिका माया चतुर, शिक्षिका श्रीमती  मुत्यालवार, शिक्षक विधाय धवणे, कमलाकर पाकमोडे, यांची तर टेमुर्डा येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश  विरूटकर, मुख्याध्यापक तानेश पावडे, अगलवार सर, बोटरे सर, गराटे सर, चिंचोलकर सर, शिक्षिका विरूटकर मॅडम यांची टेमुर्डा येथील राजीव गांधी विद्यालयात मुख्याधापक एन. एम. बोबडे, शिक्षक पेटकर सर , खिरटकर सर, पाथोडे सर,  खांबाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत खांबाडा ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश शेरकी गुरुजी, मुख्याध्यापक व्ही. डी. पडवे, शिक्षिका बेले मॅडम, गोगल सर,   खांबाडा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश शेरकी गुरुजी, प्राचार्य आर. डी. पारोथे, शिक्षक एन. एम. धोटे, एन. के. खिरटकर, मांगली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक दत्तू भुसारी, शिक्षिका अनिता टोंगे,  कोलामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका माधुरी काळे,  पिजदुरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकसह शिक्षिका व शिक्षक, पाचगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका मंगला शेंद्रे, शिक्षिका अर्चना ढवस, नितीन शास्त्रकार सर, मोवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुधीर कुंभारे, शिक्षक शैलेंद्र शेरकुरे, काटेबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक निखिल ठमके, शिक्षिका निराशा लांडे, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका भारती बावनकर, आवडे सर, ढवस सर, काळे सर, बंसोड सर, शिक्षिका पचारे मॅडम, ढेंगळे सर आदींची यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
सर्व शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू खारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Comments