वरोरा येथील नामवंत विद्यालयात शिक्षकांने केला विनयभंग मनसे व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक,शाळेमध्ये तणावाची स्थिती


वरोरा येथील नामवंत विद्यालयात  शिक्षकांने केला  विनयभंग 

मनसे व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक,शाळेमध्ये तणावाची स्थिती 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.
वरोरा शहरातील नगरपालिका जवळ असलेल्या नामवंत महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला रूम वरती बोलून विनयभंग केल्याचा प्रकार दोन शिक्षकांनी केला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांवरती कलम 74  विनयभंग व  पास्को लहान मुलीचा लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन्हीही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वरोरा पोलीस या दोन्ही गुरुजींचा शोध घेत आहेत. गुरुजी सध्या फरार असून समाज माध्यमावर या वर्तणुकीचा निषेध दर्शवला जात आहे.
नामांकित महाविद्यालयातील शिक्षक आरोपी प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे घनिष्ठ मित्र आहेत. बेलेकर गुरुजी यांचा वाढदिवस असल्याने साजरा करण्यासाठी विद्यार्थिनी शुभेच्छा देण्यासाठी स्टॉप रूम मध्ये पोहचले त्यावेळी मित्र शिक्षकाने संध्याकाळी पार्टी देण्याचे कबूल केले. हा सगळा प्रकार स्टॉप मध्ये बसून असणारे सहकारी मित्र यांना चांगलाच माहीत आहे. या प्रकरणातील साक्ष पोलिसांकडे आहे. यानंतर मित्र शिक्षकाने विद्यार्थीनीला फोन करून रूमवर बोलावून घेतले. साडेचार वाजता च्या दरम्यान विद्यार्थिनी  धनंजय पारखे गुरुजी यांच्या रूमवर विद्यार्थिनी आली. लगेच बेलेकर गुरुजीचा फोन विद्यार्थिनीला आला. यानंतर रूमवर विद्यार्थिनी आणि हे दोन गुरुजी वाढदिवसानिमित्त बोलले. बेलेकर गुरुजींनी वाढदिवसानिमित्त डेरी मिल्कचे चॉकलेट विद्यार्थिनीला दिले. लगेच गुरुजींनी रिटर्न गिफ्ट मागितले. रिटर्न गिफ्ट मध्ये मिठी मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थिनी पुढे ठेवण्यात आला. विद्यार्थिनी ते नाकारले तेव्हा गुरुजींनी हात पकडून जबरदस्ती मिठी देण्याचा प्रयत्न केला. 
धास्तावलेल्या विद्यार्थिनी ने घरचा रस्ता पकडत हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला.

हा सगळा प्रकार शिक्षक पेशातील आणि पत्रकार पेशातील व्यक्तींनी करावा या मानसिकतेला समाजातून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे.

सामाजिक संघटना आक्रमक

 यानंतर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नोओमी साठम यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस निरीक्षक अजिंक्य तांम्हडे , एपीआय भस्मे भद्रावती येथील महिला पोलीस अधिकारी  तक्रार दाखल करून या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

यानंतर या महाविद्यालयात जाऊन मनसे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्तेनी रोडवर तोंडाला काळ्या फिती  लावून महाविद्यालयापुढे आंदोलन सुरू केले . 
या प्रकरणात आरोपींना तात्काळ निलंबन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. यावर लगेच प्रतिक्रिया देत महाविद्यालयातर्फे या दोन्ही शिक्षण त्यांना निलंबन करण्याचे ठरवले आहे.

पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत असून दोन्ही शिक्षक फरार आहे.
-----------------------------------------------



Comments