वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे . वरोरा (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: इंडिया कॅरम क्लब, वरोरा तर्फे येत्या २२, २३, २४ व २५ मार्च रोजी भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक सभागृह, पोलीस स्टेशन समोर, वरोरा (नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत) येथे पार पडणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केल्या जाते. स्पर्धेत सिंगल व डबल अशा दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंगल गटात प्रथम क्रमांकास ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५,००१ रुपये , तृतीय क्रमांकास ७,००१ रुपये  देण्यात येतील. डबल गटात प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये (मा.सौ. अर्चना आशिषभाऊ ठाकरे, नगराध्यक्षा, स्व. बाबाजी खापने स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. जगदीश खापणे, मा.सौ. लिना संजय गयनेवार यांचेतर्फे), द्वितीय क्रमांकास २५,००१ रुपये (स्व. अभय मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. भारत नेरकर, मा.श्री. मनीष जेठानी, मा.श्री. कुणाल रुयारकर, मा.श्री. गजानन जीवतोडे, मा.श्री. भरत तेला यांचेतर्फे), तृतीय क्रमांकास ११,००१ रुपये (मा.श्री. क...

*भद्रावती नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर कुलथे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश**जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती*

*भद्रावती नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर कुलथे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश*

*जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती*
 
भद्रावती 
चेतन लुतडे 

स्थानिक नगरपालिका क्षेत्रातील विजासन वार्डचे रहिवासी तथा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सुधाकर सदाशिव कुलथे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नुकताच प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुधाकर कुलथे गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी दलित शोषित संघर्ष समितीत (बीएस४) कार्य केले. १९९० मध्ये बहुजन समाज पार्टीने मंडल आयोग लागू करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मार्च आयोजित केला होता. या आंदोलनात सुधाकर कुलथे यांनी सक्रिय सहभाग घेऊन पूर्व विदर्भात सायकलने दौरा केला. भद्रावती नागरिक सहकारी पतसंस्थेचे ते माजी संचालक सुद्धा आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याने प्रेरित होऊन सदर पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सुधाकर कुलथे यांनी याप्रसंगी सांगितले.
सुधाकर कुलथे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे,तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे,युवासेना सरचिटणीस येशु आरगी,युवासेना तालुकाप्रमुख राहुल मालेकर, माजी नगरसेवक प्रशात कारेकर,उपतालुकाप्रमुख  शिला आगलावे,भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, वर्षा ठाकरे, गजानन गोवारदिपे , शरद पुरी , अनिल सिंग, शशिकांत राम, आकाश बागल, आकाश बुरडकर, स्वप्नील दाते, अनिल दडमल, बादल विरुटकर, मनोज टिपले,  विश्वास कोंगरे, भुमेश्वर वालदे,विशाल नारळे, गजानन स्वान, महेश उताने , संजय उमरे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Comments